डिजिटल फ़ोरट्रेस ( Digital Fortress by Dan Brown and translated in Marathi by Ashok Padhye )
खरोखरच हे नॉवेल एकदम जबरदस्त आहे. एकदा हातात घेतले की सोडवत नाही. क्षणाला क्षणाला थरार, घडणार्या चित्तथरारक (spine chilling) घटना, कथेत येणारी अनपेक्षित पण काळजाचा ठोका चुकवणारी वळणे असे बरेच काही ह्या नॉवेलमध्ये आहे. ह्यामुळे नॉवेलमध्ये वाचक नखशिखांत (completely immersed) डूबून राहतो. जणूकाही वाचकाला बाह्यजगाचा विसर पडतो. Super computers, cryptography, information security, encryption, firewalls, secure access tunnels, databases म्हणजे नक्की काय आणि त्यांचे देशाच्या द्रुष्टीने असणारे अनन्यसाधारण महत्व हे सर्व नॉवेल वाचताना कळते. मित्रांनो नक्की वाचा हे नॉवेल !!!

मला ह्या नॉवेलचा मराठी अनुवाद हवा होता. मराठीमध्ये नॉवेल वाचतना जो feel आला तो एकदम जबरदस्त होता. मराठीतील शाब्दीक वाक बाणांच्या मारामुळे हे नॉवेल अधिकच खुलले. मराठी आवृत्ती बाजारात मला मिळाली नाही म्हणून मी नॉवेल खालील वेबसाईट वरून ऑर्डर केले…. 

http://www.infibeam.com/Books/bhavkallol-marathi-k-satyanarayan/9788184981865.html?utm_term=Digital+Fortress++Marathi_1_1
डिजिटल फ़ोरट्रेस ( Digital Fortress by Dan Brown and translated in Marathi by Ashok Padhye ) डिजिटल फ़ोरट्रेस ( Digital Fortress by Dan Brown and translated in Marathi by Ashok Padhye ) Reviewed by Nikhil Bhalwankar on July 05, 2013 Rating: 5

No comments:


Powered by Blogger.