Skip to main content

Posts

Showing posts from January, 2013

बॉण्ड विथ द बेस्ट ( Bond with the best ) - Skyfall

रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा जेम्स बॉंण्ड चा २३ वा चित्रपट १ नोवेंबर ला भारतात प्रदर्शीत झाला. २००८ च्या "क्वांटम ऑफ़ सोलेस" नंतर जवळ जवळ ४ वर्षांनी बॉंण्ड चा "स्कायफ़ॉल" प्रदर्शीत झाला. १९६२ साली "डॉक्टर नो." नावाचा पहीला बॉंण्डपट प्रदर्शीत झाला होता. आणि म्हणूनच हे बॉंण्डचे ५० वे वर्ष आहे. ५० वे वर्ष असल्यामुळे स्कायफ़ॉल कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्शा होत्या. आणि खरोखरच स्कायफ़ॉल प्रेक्षकांच्या सर्व अपेक्शा पूर्ण करणारा निघाला. सुरुवात ते शेवट संपूर्ण थरार असे ह्या चित्रपटाचे वर्णन केले तर काहीच वावगे नाही. हा पहीला बॉण्डपट असेल ज्यात आधुनीक तंत्रद्यान खूप कमी वापरलेले आहे. तरीसुद्धा चित्रपट अगदी शेवट पर्यन्त प्रेक्शकाला निराश करत नाही. सिनेमा चे कथानक मूळात असेच आहे. बॉण्डचे एम.आय.६ (MI6) हेड्क्वार्टर ऑफ़िसच जिथे बॉम्ब ब्लास्ट मध्ये उडवले जाते तिथे आधुनीक तंत्रद्यान पर्यायी एम.आय.६ (MI6) हेड्क्वार्टरमध्ये कुठून बनवणार??? तरी सुद्धा बॉण्ड आणि त्याची बॉस एम (जूडी डेंच) दोघे जी व्हीलन ला शेवट पर्यंत लढत देतात ती खरोखरच पा...