बॉण्ड विथ द बेस्ट ( Bond with the best ) - Skyfall

रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा जेम्स बॉंण्ड चा २३ वा चित्रपट १ नोवेंबर ला भारतात प्रदर्शीत झाला. २००८ च्या "क्वांटम ऑफ़ सोलेस" नंतर जवळ जवळ ४ वर्षांनी बॉंण्ड चा "स्कायफ़ॉल" प्रदर्शीत झाला. १९६२ साली "डॉक्टर नो." नावाचा पहीला बॉंण्डपट प्रदर्शीत झाला होता. आणि म्हणूनच हे बॉंण्डचे ५० वे वर्ष आहे. ५० वे वर्ष असल्यामुळे स्कायफ़ॉल कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्शा होत्या. आणि खरोखरच स्कायफ़ॉल प्रेक्षकांच्या सर्व अपेक्शा पूर्ण करणारा निघाला. सुरुवात ते शेवट संपूर्ण थरार असे ह्या चित्रपटाचे वर्णन केले तर काहीच वावगे नाही.

हा पहीला बॉण्डपट असेल ज्यात आधुनीक तंत्रद्यान खूप कमी वापरलेले आहे. तरीसुद्धा चित्रपट अगदी शेवट पर्यन्त प्रेक्शकाला निराश करत नाही. सिनेमा चे कथानक मूळात असेच आहे. बॉण्डचे एम.आय.६ (MI6) हेड्क्वार्टर ऑफ़िसच जिथे बॉम्ब ब्लास्ट मध्ये उडवले जाते तिथे आधुनीक तंत्रद्यान पर्यायी एम.आय.६ (MI6) हेड्क्वार्टरमध्ये कुठून बनवणार??? तरी सुद्धा बॉण्ड आणि त्याची बॉस एम (जूडी डेंच) दोघे जी व्हीलन ला शेवट पर्यंत लढत देतात ती खरोखरच पाहण्यासारखी आहे. बॉण्ड्ची भूमिका अर्थातच "डॅनियल क्रेग" ने केलेली आहे. "कसिनो रोयाल" आणि "क्वांटम ऑफ़ सोलेस" पेक्शा वरचढ अभिनय डॅनियल क्रेग ने ह्या चित्रपटात केला आहे.




चित्रपटाची सुरुवातच खूप थरारक आहे. बॉण्ड आणि त्याची साथीदार "ईव्ह मनीपेनी" एका अद्न्यात व्यक्तीचा पाठलाग करत आहेत. बॉण्ड आणि ती व्यक्ती धावत्या रेल्वेच्या टपावर लढत आहेत. ईव्ह मनीपेनी बाजूला रोड्वरून कार मध्ये सुसाट वेगाने चाल्ली आहे. वेळ प्रसंगी बॉण्ड्ला मदत आणि चालू असलेल्या पाठलागाची सगळी माहिती एम ला पोहोचवणे हे तिचे काम. एकदम बाका प्रसंग. पावलागणिक बॉण्ड वर येणारी एक एक संकटं आणि मनीपेनीची त्यावर करडी नजर. हा खेळ सतत चालू आहे. एक वेळ अशी येते की रेल्वे उंच पूलावर , दोन्ही बाजूला खूपच खोल दरी आणि दरीखाली वेगाने वाहणारी नदी. बाजूला समांतर रस्त्यावर मनीपेनी आणि रेल्वेचा पूल संपल्यावर लगेच लांबलचक बोगदा. म्हणजे मनीपेनीकडे त्या अद्न्यात व्यक्तीला स्नायपर ने गोळी घालून ठार मारायला फ़क्त काहीच सेकंदाचा वेळ आहे. आणि त्यात चूक झाली तर गोळी बॉण्ड ला पण लागू शकते. हाच तो क्षण जिथे प्रेक्षक खूर्चीला खिळून बसतो. I repeat I don't have clean shot. I may hit Bond. ही मनीपेनीची वाक्य त्यावेळेस बरेच काही सांगून जातात. तरीही एम Take the bloody shot. सांगून मनीपेनीला गोळी झाडायला सांगते आणि गोळी नेमकी बॉण्ड ला लागते. बॉण्ड नदीत कोसळतो.......

ह्या प्रसंगानंतर सुरू होते ते बॉण्ड्चे शिर्षक गीत. ऍडेले ने गायलेले हे गीत आतापर्यंतच्या सगळ्या बॉंण्ड शिर्षक गीतांमध्ये द बेस्ट आहे. ह्या गाण्याचे बोल पूढील प्रमाणे. हे गाणे इतके प्रसिद्ध झाले आहे की आजतागायत यूट्यूब वर ह्या गाण्याला जवळ जवळ करोडो हिट्स आहेत.


बॉण्ड ह्या हल्यातून वाचतो...परत येतो आणी एम च्या जिवात जीव येतो. मधल्या काळात एम.आय.६ (MI6) हेड्क्वार्टरवर हल्ला होतो आणि एम सोडून कोणीही त्यात वाचत नाही. पण बॉण्ड आता त्या धक्यातून सावरत असतो. मनाने खंबीर पण शरीराने थोडा कमकूवत. त्याचा खास बॉण्ड टच परत यावा म्हणून एम खूप प्रयत्न करते. शेवटी पर्याय नाही म्हणून एम बॉण्डला पूर्णपणे फ़िट नसताना देखील व्हीलनपाठी पाठवते. बॉण्डला ह्या वेळी मिळते ती फ़क्त एक बन्दूक.....बस. Q ने ही बन्दूक बॉन्डला देताना जे वाक्य बोल्ले आहे ते खूप जबर्दस्त आहे......The Walther PPK/S nine-millimeter short. It's been coded to your palmprint so only you can fire it. Less of a random killing machine, more of a personal statement. 

सिनेमाचा व्हीलन राऊल सिल्वा (जेविअर बर्डेम) ह्याने अप्रतीम अभिनय केलाय. किंबहुंना पूर्ण सिनेमात त्याचाच अभिनय सगळ्यात जास्त डोळ्यात भरतो. त्याचा एक डायलॉग मी अजीबात विसरू शकत नाही. She sent you after me, knowing you are not ready. Knowing you would likely die....Mommy was very bad. राऊल सिल्वाचे प्रमूख पारध एम असते. सिल्वाचे प्रत्येक डावपेच बॉण्डपेक्शा एक पाऊल पुढेच असतात आणि म्हणूनच बॉण्डला एम ला सिल्वापासून वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाश्ठा कारावी लागते. सिनेमाचे नाव अगदी साजासे घेतले आहे. सिल्वा आणि बॉण्ड मधील शेवटची लढत बॉण्डने जिथे बालपण घालवले त्या बंगल्यात आहे. बंगला शहराच्या खूप बाहेर, जिथे आकाश आणी जमीन ह्यांचे मिलन होते अश्या डोंगराळ भागात आहे. अश्याच जागेला स्कायफ़ॉल म्हणतात. आणि हेच बंगल्याचे नाव सुद्धा आहे. आता बॉण्ड कसा लढतो आनि तो एम ला वाचवू शकतो का ते सिनेमा बघून तुम्हाला कळेल !!!

हे बॉण्ड चे ५० वे वर्ष. आत्तापर्यंत ६ नायकांनी बॉण्ड ची भूमीका केलेली आहे. ५० वर्ष म्हणजे खरोखरच खूप मोट्ठा काळ आहे आहे आणि प्रत्येक बॉण्डपट हिट होणे ही खरोखरच सन्मानाची बाब आहे. आत्तापर्यंत प्रदर्शीत झालेले बॉण्डपट पूढील प्रमाणे,


नायक:- शॉन कोनेरी
१) डॉक्टर नो. (१९६२)
२) फ़्रॉम रशिया विथ लव्ह (१९६३)
३) गोल्ड्फ़िंगर (१९६४)
४) थंडरबॉल (१९६५)
५) यू ओन्ली लीव्ह ट्वाईस (१९६७)
६) डायमंड्स आर फ़ॉरेवर (१९७१)

नायक:- जॉर्ज लेझेन्बी
७) ऒन हर मॅजेस्टीज सिक्रेट सर्विस (१९६९)

नायक:- रॉजर मूर
८) लिव्ह ऍण्ड लेट डाय (१९७३)
९) द मॅन विथ द गोल्डन गन (१९७४)
१०) द स्पाय व्हू लव्हड मी (१९७७)
११) मूनरेकर (१९७९)
१२) फ़ॉर यूअर आईज ओन्ली (१९८१)
१३) ऑक्टोपसी (१९८३)
१४) अ व्ह्यूव्ह टू कील (१९८५)

नायक:- टिमोथी डाल्टन
१५) द लिव्हिंग देलाईट्स (१९८७)
१६) लायसन्स टू कील (१९८९)

नायक:- पिअर्स ब्रोस्नन
१७) गोल्डन आय (१९९५)
१८) टूमॉरो नेवर डाईज (१९९७)
१९) द वर्ल्ड इज नॉट ईनफ़ (१९९९)
२०) डाय अनदर डे (२००२)

नायक:- डॅनियल क्रेग
२१) कसिनो रोयाल (२००६)
२२) क्वांटम ऑफ़ सोलेस (२००८)
२३) स्कायफ़ॉल (२०१२)  


(Source:- Wikipedia)
बॉण्ड विथ द बेस्ट ( Bond with the best ) - Skyfall बॉण्ड विथ द बेस्ट ( Bond with the best ) - Skyfall Reviewed by Nikhil Bhalwankar on January 03, 2013 Rating: 5

No comments:


Powered by Blogger.